
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू कश्मीरमधील वारपोरा येतील सोपोर भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले असून ही चकमक अजून सुरू आहे.
#UPDATE Indian Army: One terrorist has been killed. Operation is in progress in Warpora, Sopore. https://t.co/MoqVceQzRs
— ANI (@ANI) March 22, 2019
काल पोलिसांच्या प्रतिनिर्बंधित क्षेत्रात काही दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सुरक्षा दलाचे तीन अधिकारी जखमी झाले होते. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाल्यानंतर एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ही मोहीम अजून सुरू आहे.
आजच कश्मीरमध्ये सैन्याने चार दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले आहे. या मोहीमेत दहशतवाद्यांनी १२ वर्षीय मुलाला ओलीस ठेवले होते. परंतु दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली.

























































