उद्यापासून अभ्यासाला सुरुवात, अकरावीचेही ऑनलाइन वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणामुळे अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. प्रवेश कधीपर्यंत पूर्ण होतील यावर सध्या तरी प्रश्नचिन्ह असून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी इतर इयत्तांच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच या विद्यार्थ्यांचेही ऑनलाईन वर्ग घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. 2 नोव्हेंबरपासून अकरावीच्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे.

अकरावी सायन्स, कॉमर्स, आर्टस् शाखेच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग मराठी व इंग्रजी माध्यमातून भरणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांना नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी ज्या शाखेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहे त्या शाखेसाठी त्याने नावनोंदणी करायची असून ऑनलाईन वर्गाचे वेळापत्रक व आवश्यक तपशील विद्यार्थ्यांना त्यांच्या ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर मिळणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

नावनोंदणीसाठी लिंक
https://covid19.scertmaha.ac.in/eleventh