
राज्यातील महाविद्यालये उद्यापासून सुरू होत आहेत. कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार असून, लसीकरण पूर्ण न झालेल्यांना ऑनलाइन शिकावे लागेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे दिली.
15 फेब्रुवारीपर्यंतच्या विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन होतील. त्यानंतर पुढील परिस्थिती पाहूनच परीक्षेबाबतचा निर्णय घेतला जाईल. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील पदव्युत्तर विभागात 20 पदे आहेत. ती सर्वच्या सर्व रिक्त आहेत. त्यासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाकडे प्रस्ताव पाठवून ती पदे भरण्यासाठी प्रयत्नशील राहू, असेही मंत्री सामंत म्हणाले.

























































