अदानींवरील कर्जाचा डोंगर वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंडेनबर्ग अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. गेल्या वर्षभरात अदानी समूहावरील कर्जात जवळपास 21 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हिस्सा हा जवळपास एक तृतीयांश झाला आहे. मार्चअखेर अदानी समूहाच्या कर्जापैकी 29 टक्के कर्ज जागतिक बँका आणि वित्तीय संस्थांचे होते, अशी माहिती ‘ब्लूमबर्ग’ने दिली आहे.

या वर्षीच्या 31 मार्चअखेरीस अदानी समूहाच्या प्रमुख 7 सूचीबद्ध पंपन्यांचे एकूण कर्ज 20.7 टक्क्यांनी वाढून 2.3 लाख कोटी रुपये झाले आहे. अदानी समूहावरील कर्जाचा बोजा 2019 पासून सातत्याने वाढत आहे आणि सध्या तो कमी करण्यासाठी समूहाकडून तातडीने पावले उचलली जात आहेत. तथापि, समूहाची कर्ज परतफेड करण्याची क्षमताही वाढल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते