ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

आर्ट सर्कल रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक पुणे यांच्यावतीने यंदा दि.७ ते ९ डिसेंबर दरम्यान स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा पुलोत्सव सन्मान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जाहिर करण्यात आला असल्याची माहिती नितीन कानविंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे पुलोत्सव विशेष आर्कषण ठरणार आहे. दिनांक ७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पुलोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी सुप्रिया चित्राव संवाद साधणार आहे. त्यानंतर अपरिचित पु.ल. हा कार्यक्रम अभिनेते गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत काळे आणि सतीश आळेकर सादर करणार आहेत.

दिनांक ८ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘एक झुंज वाऱ्याशी’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन सचिन जोशी यांनी केले आहे. ‘एक झुंज वाऱ्याशी’ मध्ये राजेश देशमुख, सुनील अभ्यंकर, मंजिरी साने, डॉ. विवेक बेळे हे कलाकार आहेत. पुलोत्सवात पु. ल. वरील लघुपट दाखविण्यात येणार आहेत, अशी माहिती कानविंदे यांनी दिली. यावेळी भालचंद्र तेंडूलकर, डॉ.मेधा गोंधळेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.