महापूजेला कोण येणार? फडणवीस की अजित पवार; मंदिर समितीपुढे पेच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण कोणाला द्यायचे यावरून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापनासमोर भलताच पेच निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे, तर अजितदादा डोळे वटारणार; अजितदादांना निमंत्रण द्यावे, तर फडणवीस नाराज होतील या भीतीने महापूजेचा निर्णय राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या गळय़ात मारून मंदिर समिती नामानिराळी झाली आहे. 23 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीला श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असते, तर आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेची परंपरा ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेली आहे.