आता कुणालाही भाऊ म्हणायला भिती वाटते – पंकजा मुंडे

9218

देवेंद्र फडणवीस हे माझे मित्र आहेत. हल्ली कुणालाही भाऊ म्हणायला मला भिती वाटते अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंनी माझ्याबाबतीत नेहमीच नकारात्मक टिप्पणी करू नये त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडे आणि खडसेंशी चर्चा करू – देवेंद्र फडणवीस

एका मराठी वृत्तवाहिनीला मुलखत देताना फडणवीस म्हणाले होते की पंकजा मुंडे या मला बहिणीसारख्या आहेत. त्या माझ्या सहकारी आहेत असे फडणवीस म्हणाले होते. पंकजा मुंडे यांना फडणवीस यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी फडणवीस माझे मित्र आहेत अशी प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस माझे असे मित्र आहे की त्यांच्याकडे मी माझे मत स्पष्टपणे मांडू शकते. ते माझे मित्र राहतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच उद्धव ठाकरे, महादेव जानकर हे माझे भाऊ आहे, त्यांचे माझे नाते हे मुंडे साहेब असतानाचे आहेत. आता कुणालाही भाऊ म्हणायला भिती वाटते” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

एकनाथ खडसे हे उद्विग्न नेते असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच धनंजय मुंडे हे आता आमदार झाले आहेत. त्यांना शुभेच्छा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या