त्या पोलिसाची हकालपट्टी करा: परळी वकील संघाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी न्यायालयाच्या आवारात दलाली करणाऱ्या सिरसाळा येथील पोलिसाची हकालपट्टी करण्याची मागणी परळी वकील संघाने केली आहे, अशा आशयाचे निवेदन वकील संघाने पोलीस अधीक्षक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे दिले आहे.

सिरसाळा पोलीस स्टेशन येथे नियुक्त असलेल्या व परळी न्यायालयात कोर्ट ड्यूटी म्हणून कार्यरत असलेले पोलीस शिपाई व्हि.टी.सोळंके बक्कल नंबर 1400 हे न्यायालयाच्या आवारात दलाली करीत असल्याचे आढळून आल्याचा दावा परळी वकीक संघाकडून करण्यात आला आहे. न्यायालयात अमुक वकील लावणे, जेष्ठ वकीलांची बदनामी करणे, आरोपींना स्वतः गाडीवर घेऊन फिरणे, आरोपींना वकीलांच्या परस्पर तारखा देणे अशा प्रकारचे प्रकार वारंवार होत आहेत. परळी वकील संघात या सर्व प्रकराबद्दल व्यापक चर्चा होऊन सदर पोलीस शिपायाविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे एका ठरावाद्वारे केली आहे.

याबाबतीत परळी वकील संघाच्या वतीने एकमताने ठराव घेऊन न्यायालयाकडे निवेदन दिले. यावेळी संघाचे अध्यक्ष अॅड. पी.एम.सातभाई सचिव अॅड.उषा दौंड, अॅड.हरीभाऊ गुट्टे, अॅड.मिर्झा, अॅड.माधवराव मुंडे, अॅड.डि.एल.उजगरे, अॅड. वंसत फड, अॅड.आर.व्ही.गित्ते, अॅड.टि.के.गोलेर, अॅड.राजेश्वर देशमुख, अॅड. प्रदिप गिराम, अँड लक्ष्मण आघाव, अॅड.डि.एस.उजगरे, अॅड.दत्ता कराड, अॅड. सचिन सोळंके, अॅड.लक्षमण गित्ते, अॅड.ज्ञानोबा मुंडे, अॅड.गजानन पारेकर, अॅड.मोहन कराड, अॅड. सायस मुंडे, अॅड.प्रल्हाद फड, अॅड.सुनिल सोनपीर, अॅड.वाय.आर.सय्यद, अॅड.राहुल सोळंके, अॅड.धनाजी कांबळे, अॅड.केशव आघाव, अॅड.रूद्र कराड आदी उपस्थित होते.