परळ टर्मिनसमधून नवीन वर्षात दहा नव्या फेऱया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकातील नव्या फलाटाचे काम अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षात येथून परळ लोकल धावणे शक्य होणार आहे. त्यामुळे येथून दहा फेऱया सोडण्याचे नियोजन असून नव्या परळ टर्मिनसमुळे दादर स्थानकाची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. परळ टर्मिनसचा नवा टर्मिनल फलाट वाढविण्याचे काम वेगाने सुरू आहे. ते पूर्ण होताच त्यावरून स्वतंत्रपणे परळ लोकलच्या फेऱया चालवण्याचा विचार आहे.

– मुंबईत 1985 नंतर तब्बल 32 वर्षांनी नवीन टर्मिनस सुरू होणार आहे. या टर्मिनसवरून फेऱया चालविताना सध्याच्या मूळ फेऱयांमध्ये काहीही वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट केले जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणाऱया काही फेऱया कमी करून परळ टर्मिनसवरून चालवल्या जाणार आहेत. सकाळ आणि सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेत या फेऱया चालवल्या जातील. त्याचा फायदा गर्दीच्या वेळेस प्रवास करणाऱया हजारो प्रवाशांना होणार आहे.