
सामना प्रतिनिधी, पणजी
बुधवारपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दक्षिण गोव्यातील पारोडा रस्ता पूर्ण पणे पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे कुडचडे ते मडगाव व्हाया केपे वाहतूक ठप्प झाली आहे.
आज सकाळ पासून मडगाव मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक चांदोर मार्गे वळवण्यात आली आहे. प्रवासी बसेस सुद्धा चांदोर मार्गे सोडण्यात आलेल्या आहेत. मार्ग बंद झाल्याने याचा सर्वात जास्त फटका नोकरदार आणि विद्यार्थी वर्गाला बसला आहे. काल रात्री उशिरा हा रस्ता पाण्या खाली गेला आहे.
दरवर्षी प्रमाणे कुशावती नदीला पूर आल्याने सुमारे तीन किलोमीटरचा रास्ता पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, पारोडा भागात जाणाऱ्या पुलावरुन सुद्धा पाणी गेले असून हा पूल सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.


























































