1 / 6
IPL 2021 च्या 17 व्या सामन्यात के.एल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पंजाब किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सहज पराभव केला. पंजाब किंग्जने फक्त 1 गडी गमावत मुंबई इंडियन्सने दिलेले आव्हान पूर्ण केले.
पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकत पहिले गोलंदाजीचा निर्णय घेत सगळ्यांना आश्चर्यचकीत केलं होतं. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. पहिल्या 10 षटकात मुंबईला फक्त 48 धावा करता आल्या.
रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव या जोडीने मुंबई इंडियन्सला शंभरी पार करून दिली. रोहितने 63 तर यादवने 33 धावा फटकावल्या. मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 131 धावाच करता आल्या.
पंजाबचा कर्णधार केएल राहुल याने सलामीवीर मयांक अगरवालच्या साथीने त्याच्या संघाला अपेक्षित अशी सुरुवात करून दिली. मयांक 25 धावांवर बाद झाल्यानंतर राहुलने ख्रिस गेलच्या मदतीने तुफानी फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला

























































