जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल – अजित पवार

कायदा व सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल. जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच जी वस्तुस्थिती आहे… जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचे कारण नाही, असं ही ते म्हणाले आहेत.

माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता बदल्यांचे रॅकेटबाबत भाष्य केले.

पोलिस बदल्यांचे रॅकेट आहे, असे बोलले जात आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत. त्यांची विश्वासार्हता काय आहे. त्याच्यात नावे आहेत. यादी आहे, त्या यादीत नावे टाकली त्यांच्या बदल्या झाल्यात का? त्यांची कागदपत्रे दाखवू का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या