1 / 6
मेरिलिन मनरो.. हॉलिवूडची अद्वितीय सौंदर्यवती.. जितकं वलयांकित तितकंच वादग्रस्त आयुष्य जगलेल्या या अभिनेत्रीचा 2 जून हा वाढदिवस.
मेरिलिनचं खरं नाव होतं नॉर्मा जीन. तिचा जन्म 2 जून 1926 रोजी झाला. तिची आई चित्रपटांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका करत असे. वडिलांच्या मायेला लहानपणीच मेरिलिन पारखी झाली होती.
सुरुवातीला मॉडेल म्हणून काम करणारी मेरिलिन हळूहळू चित्रपटांकडे वळली. तिच्या अद्वितीय सौंदर्यामुळे ती लोकप्रिय झाली.
सेव्हन इयर इच, जेंटलमन प्रिफर ब्लाँड्स, नायगरा, द प्रिन्स अँड द शो गर्ल हे तिचे काही गाजलेले चित्रपट. वरील दृश्य हे सेव्हन इयर इच चित्रपटातील असून तिची ओळख बनलं.

























































