1 / 10
दूध- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. दुधामधील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढीचं नियमन होतं, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
दही - दह्याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. दही केस,त्वचा यासाठी देखील उपयुक्त आहे.100 ग्रॅम दही मध्ये 11 ग्रॅम प्रथिने असतात.
काबुली चणे - काबुली चण्यांमध्ये प्रथिने, तंतू असतात.100 ग्रॅम चण्यांमध्ये 15 ग्रॅम प्रथिने आढळतात. काबुली चणांचे सेवन केल्याने भुकेवर नियंत्रण राहते.
शेंगदाणे - थंडीमध्ये भाजलेले शेंगदाण्यांचे सेवन केल्यास सांधे दुखी आणि कंबर दुखी या समस्या दूर होतात.तसेच रक्ताची कमतरता देखील दूर होते. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.
काजू - प्रथिने मिळवण्याचा एक उत्तम स्रोत म्हणजे काजू. याच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम काजूमध्ये 18 ग्रॅम प्रथिने असतात. मात्र, याचं सेवन मर्यादित प्रमाणात करणंच उत्तम असतं.
































































