Photo – सई ताम्हणकरच्या लूकने नेटकरी क्लीन बोल्ड!

सई ताम्हणकर ही अभिनेत्री मराठीची आघाडीची अभिनेत्री आहे. मराठीतून तिने हिंदीतही पदार्पण केलं आहे आणि तिथेही पुरस्कार मिळवले आहेत. सध्या ती सिंगापूर येथे असून एले फॅशन पुरस्कारांसाठी तिला आमंत्रण मिळालं आहे. त्या सोहळ्यासाठी तिने खास लूकची निवड केली असून बोल्ड पद्धतीचा हटके ड्रेस परिधान केला आहे. तिच्या लूकवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.