Photo – गहिरी नजर आणि कातील अदा, तमन्नाच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा

बाहुबली, हिंमतवालासारखे चित्रपट आणि लस्ट स्टोरीज, जी करदा अशा वेबसीरीजमधून झळकलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया ही कमालीची सौंदर्यवान अभिनेत्री आहे. तिचे अनेक फोटो नेटकऱ्यांमध्ये भलतेच लोकप्रिय असतात. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे, त्यातला तिचा लूक अतिशय बोल्ड आहे. बोल्ड नेकलाईन आणि फिशटेल कट पद्धतीचा गाऊन आणि त्यावर बेसिक न्यूड मेकअपने तिने आपला लूक पूर्ण केला आहे. पण, त्या फोटोशूटमध्ये तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.