पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. एम. एस. स्वामिनाथन आणि चौधरी चरण सिंह यांना ‘भारतरत्न’ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Charan Singh), माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव (P. V. Narasimha Rao) आणि कृषीतज्ज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन (M. S. Swaminathan) यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एकामागोमाग एक ट्विट करत एकाच दिवशी तिघांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली.

दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांना भारतरत्न जाहीर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबतचे फोटो शेअर करत त्यांचा भारतरत्न सन्मान जाहीर केला. ‘मला हे सांगताना आनंद होतोय की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नाने सन्मानित केले जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या. ते आपल्या काळातील सर्वात आदरणीय राजकारणी असून त्यांनी देशाच्या विकासात दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. तळागाळातून कामाला सुरुवात करून त्यांनी देशाच्या उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. त्यांनी गृह खाते आणि माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून देखील काम केले’, असे ट्विट मोदी यांनी केले.

लालकृष्ण अडवाणी यांनी गेल्या अनेक दशकांपासून देशाची सेवा केली. एकता, पारदर्शकता आणि राजकीय नैतिकतेचे अनेक उदाहरणं त्यांनी स्थापित केले. त्यांना भारतरत्नाने सन्मानित करणे हा खूपच भावनिक क्षण आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्याकडून शिकण्याच्या अगणित संधी मिळाल्या हे मी नेमहीच माझे भाग्य समजतो, असेही मोदी म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

तत्पूर्वी 23 जानेवारी रोजी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचे सरकारने जाहीर केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी रोजी त्यांच्या 100 व्या जयंतीदिनी ही घोषणा केली होती. कर्पुरी ठाकूर यांनी दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद भूषवले आणि एकदा उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.