मिरजोळे पाटीलवाडीतील गावठी हातभट्टीवर पोलीसांची धाड, सव्वातीन लाखांचा मुददेमाल जप्त

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथील विनापरवाना सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत 40 लिटर गावठी दारुसह 3 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.

मिरजोळे पाटीलवाडी येथे हातभटटी सुरु असल्याची खबर पोलीसांना लागली पोलीसांनी या हातभट्टीवर धाड टाकली त्यावेळी एक 24 वर्षीय तरुण गावठी हातभट्टीची दारु गाळत असताना सापडला त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले हातभट्टीमध्ये 400 लीटर गावठी दारु, 200 लिटर क्षमतेचे 60 बॅरल, 12 हजार लिटर रसायन असा एकूण 3 लाख 23 हजार रुपयांचा मुददेमाल जागीच नष्ट करुन गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी, पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, शहर पोलीस ठाण्याचे पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि क्युआरिटी पथकाने केली

गावात गावठी हातभटटी सुरु असेल तर पोलीसांना करा फोन

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्हावासियांना थेट आवाहन केले आहे जिल्ह्यामध्ये विनापरवाना, गैरकायदा गावठी हातभट्टीची दारु तयार केली जात असेल तर दारु तयार करणाऱ्यांवर एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरीकांनी गावठी हातभट्टीबाबतची माहिती पोलीसांना मोबाईल नं 8263883319 वर कळवावी असे आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.

गावागावात हातभट्ट्या, शहरात गुत्ते, पोलीसांसमोर आव्हान

पोलीसांनी विनापरवाना गावठी हातभट्टीवर कारवाई करण्याची मोहिम हाती घेतली आहे प्रत्यक्ष गावागावात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु आहेत तर शहरात दारुचे गुत्ते आहेत पोलीसांसमोर या गावातील हातभट्ट्या शोधुन कारवाई करणे एक आव्हान आहे.