
ब्रिजमोहन पाटील । पुणे
रेल्वे पुढे उडी मारून पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास शिवाजीनगर येथील संगम पुलाजवळ घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सानप यांच्यावर सोमवारी नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
साजन सानप (वय 37, मुळ रा. सोनोशी गाव, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा) असे आत्महत्या साजन सानप हे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सानप हे कशासाठी पुण्यात आले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान,या आत्महत्येमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सानप यांचे पुण्यात नातेवाईक अथवा कोणी मित्र आहेत का याची माहिती पोलीस घेत आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनोज खंडाळे म्हणाले, उपनिरीक्षक सानप यांनी रेल्वेपुढे आत्महत्या का केली. याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्यावर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात काल बलात्काराचा गुन्हा झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.


























































