बॅलेट पेपरने होणार नसेल तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार – प्रकाश आंबेडकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरने झाल्या नाही तर त्यावर बहिष्कार घालणार, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. हे सरकार, निवडणूक आयोग ईव्हीएम वापरण्यात इंटरेस्टेड असेल तर आपण निवडणूक लढवूच नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर यांनी ईव्हीएममुळेच वंचितच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, बॅलेट येणार असेल तर आम्ही विधानसभा निवडणुकीत सहभागी होऊ. ही भूमिका महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. बॅलेट आलेच पाहिजे आणि नाही आले तर विधानसभा लढणार नाही. आता माझे हे मत आमचा पक्ष स्वीकारेल का, हे मी ठामपणे सांगू शकत नाही.