
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषी संथन याचा आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला. चेन्नई येथील राजीव गांधी रुग्णालयात त्याचा हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. यकृत निकामी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते.
संथन उर्फ टी सुंथेतिराजा (55) हा मूळचा श्रीलंकेचा नागरिक होता. 1991 मध्ये तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी संथन याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येत ज्या सात लोकांची सुटका केली होती त्यापैकी संथन एक होता. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, संथन याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून त्याचे पार्थिव श्रीलंकेला पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत.
संथनचे यकृत निकामी झाल्यामुळे 27 जानेवारी रोजी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याआधी तो तिरुचिरापल्ली येथील एका शिबीरात राहत होता.

























































