शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही – मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. 95 मिनिटांच्या या मुलाखतीमध्ये मोदींनी विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

  • चार वर्षात आम्ही एवढे काम केलंय की आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही – मोदी
  • राम मंदिर, तिहेरी तलाकच्या बाबतीत काँग्रेसच्या वकिलांनी अडथळे आणणे बंद केले तर प्रश्न लवकर सुटेल – मोदी
  • तिहेरी तलाक हा मुसलमानांच्या आस्थेचा नाही तर सामाजिक असमानतेचा मुद्दा आहे – मोदी
  • पाकिस्तानसह जगभरातील अनेक मुसलमान देशांमध्ये तीन तलाकवर बंदी घातली आहे – मोदी
  • तिहेरी तलाक पाकिस्तानमध्येही नाही – मोदी

  • शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – मोदी
  • कर्जमाफी हवीच, परंतु शेतकरी सक्षम करण्यावर भर – मोदी
  • जीएसटीमुळे अनेक वस्तू करमुक्त झाल्या – मोदी

  • कायद्याच्या कठोर पालनामुळे कर्जबुडव्या उद्योगपतींना परदेशात पळावे लागतेय – मोदी
  • भाजपची वेसन फक्त मोदी शहांच्या हाती नाही – मोदी
  • हरयाणा, कश्मीरच्या पोटनिवडणुकीत भाजपला भरघोस यश – मोदी
  • एकदोन निवडणुकीत अपयश मिळणे म्हणजे पक्षाची अधोगती नाही – मोदी
  • नागरिकांसाठी अनेक योजना आणण्यात आल्या – मोदी
  • 2018 हे सर्वात यशस्वी वर्ष ठरले – मोदी

  • मोदी लाट संपली म्हणणारे हे तरी मानतात की मोदी लाट होती – मोदी
  • सरकारपासून दूर जाण्यासाठी जनतेकडे कोणतेही कारण नाही – मोदी
  • आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी काही पॉलिटिकल पंडीत चुकीचे दावे करतात – मोदी
  • जातीवाद, परिवारवाद आणि भ्रष्टाचार ही काँग्रेस पक्षाची संस्कृती – मोदी

  • 2019 ची लढाई देशाविरुद्ध महाआघाडी अशी होईल – मोदी
  • उर्जित पटेल यांनी चांगले काम केले आणि त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता – मोदी
  • उर्जित पटेल यांनी त्यांच्या खासगी कारणांमुळे राजीनामा दिला – मोदी
  • आरबीआयवर कोणताही दबाव नाही – मोदी

  • नोटाबंदी हा झटका नव्हता. कारण आम्ही एक वर्षापूर्वीच लोकांना तुमच्याकडे काळा पैसा असेल तर तो जमा करा असे आवाहन केले होते – मोदी

  • सर्जिकल स्ट्राईकच्या यशापेक्षा जवानांच्या सुरक्षेची काळजी – मोदी
  • एका लढाईने पाकिस्तान शहाणा होणार नाही. पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी आणखी वेळ लागेल – मोदी

  • 70 वर्ष राज्य करणाऱ्यांना राममंदिराचा मुद्दा प्रलंबित ठेवला, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
  • राममंदिरासाठी अध्यादेश आणणार नाही, राममंदिराचा मुद्दा घटनात्मक मार्गाने सोडला जाईल – मोदी