
जागतिक आर्थिक मंचावर विविध देश, त्यातील राज्ये एकत्र येत असतात. आर्थिक, व्यापारी सहकार्य मिळावे हा या मंचाचा प्रामुख्याने उद्देश असतो. दावोस इथे ही आर्थिक परिषद दरवर्षी आयोजित केली जाते. उद्योगांशी निगडीत मंडळी, राजकीय पुढारी, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ हे प्रामुख्याने या परिषदेला हजेरी लावत असतात.
दावोसला गेल्या काही दिवसांत वेश्या मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या आहेत. स्वित्झरलँड हे प्रेक्षणीय स्थळ असून इथे दररोज पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. सध्या स्वित्झरलँडमधल्या दावोस या नयनरम्य शहरात जागतिक आर्थिक मंचावर येण्यासाठी बडी मंडळी पोहोचली आहे. मग प्रश्न निर्माण होतो की इथे वेश्या मोठ्या प्रमाणावर का आल्या आहेत.
डेली मेलने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की जेव्हा ही परिषद आयोजित केली जाते ते सेक्ससाठीची मागणी वाढते. जगभरातून आलेले बड्या आसामी, व्यावसायिक, उद्योगपती या परिषदेच्या निमित्ताने मजा करायला येत असतात. 5 दिवसांच्या या परिषदेसाठी ही मंडळी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला असतात तिथेच या वेश्या उतरल्या आहेत.
स्वित्झरलँडमध्ये वेश्यागमनाला कायद्याने परवानगी आहे, मात्र आपण वेश्या आहोत हे ओळखता येऊ नये यासाठी या वेश्या बड्या हुद्दावर असलेल्या कंपनीच्या महिला पदाधिकाऱ्यांसारखे कपडे घालून फिरत असतात. लिआना नावाच्या एका वेश्येने सांगितले की ती तासाला 760 डॉलर्स (61,816 रुपये) आणि संपूर्ण रात्रीसाठी 2500डॉलर्स फी घेते (2,03,368 रुपये) याशिवाय आपण प्रवासाचा खर्च वेगळा घेत असल्याचे तिने सांगितले.
दावोसपासून 160 किलोमीटर अंतरावर असलेला आरगाऊमधल्या एका वेश्येच्या दलालाने सांगितले की तिला 11 बुकींग मिळाली असून 25 चौकशीचे फोन येऊन गेले. येत्या आठवड्यात यात वाढ होईल असे त्याने सांगितलं. काही उद्योगपतींनी त्यांच्यासाठी तर काहींनी त्यांच्या खास व्यक्तींसाठी वेश्या बोलावल्या आहेत.