
सामना ऑनलाईन । मेरठ
मेरठ जिल्ह्यातील सरधना भागात एका माथेफिरू तरुणाने तीन वर्षाच्या मुलीच्या तोंडात चॉकलेट सांगून सुतळी बॉम्ब फोडला. बॉम्ब फुटल्याने लहान मुलीची जीभ कापली असून चेहरा गंभीररित्या जखमी झाला आहे. आरोपी मुलीच्या घरी येत जात असत परंतु मुलीवर त्याची वाईट नजर असेल असे तिच्या आईला वाटले नाही.
मुलगी जखमी झाल्यानंतर तिला एका खागजी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती गंभीर असून तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठमधील मिलक गावातील शशीकुमार यांची मुलगी आयुषी ही सोमवारी संध्याकाळी खेळत होती. तेव्हा एक माथेफिरू तरुण तिथे आला आणि आयुषीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि फोडला. बॉम्बचा आवाज ऐकताच आयुषीचे पालक बाहेर आले तेव्हा आयुषी जखमी अवस्थेत त्यांना आढळली. त्यांनी तत्काळ तिला इस्पितळात दाखल केले.
आयुषी सध्या गंभीर जखमी असून तिच्या चेहर्यावर सहा ते सात टाके लावण्यात आले आहे. आयुषीच्या वडिलांनी यासंबंधी तक्रार केली असून पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.






















































