
शहरातील मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावरील दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी 2 लाख 63 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 16 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास आरोही इंटरप्रायझेस या दुकानामध्ये घडली.
रोहन शहा (35, रा. स्वारगेट) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी रोहन शहा यांचे बाजीराव रस्त्यावर आरोही इंटरप्रायझेस नावाचे दुकान आहे. 16 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून घड्याळ, एअरपॉड, स्पीकर, ट्रीमर असा मिळून 2 लाख 62 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.


























































