पत्नीचे कपडे धुण्यास कंटाळल्याने पतीची आत्महत्या

2852

पत्नीचे कपडे धुण्यासह घरातील कामांना कंटाळून आणि सातत्याने पत्नीकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तीन दिवसांपूर्वी मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत घडली. प्रणय मिलिंद खुटाळ असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कनिका खुटाळ विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगीता खुटाळ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून दोघेही मगरपट्टा सिटीत स्वतंत्र कंपनीत कामाला होते. दीड वर्षापूर्वी गरोदरपणामुळे कनिकाने काम सोडले होते. तेव्हापासून ते मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला गेले होते. मागील काही महिन्यांपासून कनिका प्रणयला शारीरिक व मानसिक त्रास देत होती. प्रणय कामाला जाण्यापूर्वी कनिका तिचे कपडे धुण्यास सांगून घरातील कामे करून घेत होती, तसेच सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. कनिकाने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास दिला, तसेच नात्यातील मुलीशी शारीरिक संबंध असल्याचा आरोप प्रणयवर केला. त्यामुळे त्रासाला कंटाळून तीन दिवसांपूर्वी प्रणयने राहत्या घरी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. ए. भाबड करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या