पुण्यात संस्थाचालकाची शिक्षिकेकडे शरीरसुखाची मागणी, आयुष्यातून उठविण्याची दिली धमकी

प्रातिनिधिक फोटो

शालेय शिक्षण संस्थेच्या कार्यालयात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन एका संस्थाचालकानेच महिला शिक्षिकेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 47 वर्षीय शिक्षिकेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका नामांकित संस्थाचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला शिक्षिकेला आरोपी संस्थाचालकाने सतत फोन करून एकांतात भेटण्याचा तगादा लावला होता. त्यानंतर एकेदिवशी त्याने शिक्षिकेला शाळेच्या कार्यालयात गाठले. त्या ठिकाणी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन महिला शिक्षिकेचा विनयभंग केला. त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता.

शिक्षिकेने त्यास विरोध केल्यामुळे संबंधित संस्थाचालकाने महिला शिक्षिकेला ‘तू नोकरी कशी करते, तेच पाहतो, तुला आयुष्यातून उठवितो’, अशी धमकी दिली. याप्रकरणी खडकी पोलीस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या