पुण्यात तरुणाचे हातपाय बांधून खून, नवले ब्रिजजवळ पोत्यात आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

एका तरुणाचा खून करून त्याचे हात-पाय बांधून मृतदेह पोत्यात टाकून पुणे शहरातील नवले ब्रिजजवळ फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पोलीस नियंत्रण कक्षाला नवले ब्रिजजवळ एका पोत्यात मृतदेह असल्याचा कॉल आला होता. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मार्शल आणि रात्र गस्तीवरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता एका पोत्यात तरुणाचा मृतदेह आढळला. त्याचा खून केल्यानंतर हात पाय दोरीने बांधून टाकल्याचे दिसून आले आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पोलीस त्याची ओळख पटविण्याचे काम करत आहेत. गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

pune-murder