पुण्यात 12 तासांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा; हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार राहणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात वाढत्या करोना प्रादुर्भाव पाहता 12 तासांच्या नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. हा निर्णय शनिवार 3 एप्रिलपासून अंमलात येणार असून शुक्रवारी या संदर्भात आढावा घेण्यात येईल.

या निर्णयाची माहिती देताना सौरभ राव यांनी सांगितलं की, पुढील 7 दिवस हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार बंद राहाणार. याशिवाय विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. लग्न समारंभास 50 लोकांना आणि अंत्यसंस्कारात 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई मोठ्या संख्येने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात 48,000 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर देशभरात ही संख्या 81,000 वर गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधार आहे.