पुणे – कोयत्याच्या धाकाने लुटमार करणारे अटकेत, गुन्हे शाखेची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. त्यांच्याकडून 7 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विवेक रमेश शेवाळे (वय – 19, रा. खोपडेनगर, कात्रज) आणि कृष्णा तानाजी जगताप (वय – 19, रा. गणेश सोसायटी, कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कोयत्याच्या धाकाने नागरिकांची लुटमार करणारे तिघेजण कात्रज परिसरात थांबल्याची माहिती पोलीस नाईक उत्तम तारु आणि मीतेश चोरमोले यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून अल्पवयीनासह विवेक आणि कृष्णाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कात्रज तलाव रस्ता परिसरात कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्याशिवाय इंदिरानगर अप्परमध्ये एका नागरिकाच्या खिशातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, प्रतापसिंह शेळके, यशवंत आंब्रे, अनिल उसुलकर, उत्तम तारु, विशाल भिलारे, विवेक जाधव, मितेश चोरमोले, गोपाळ मदने यांच्या पथकाने केली.