
विश्रांतवाडीवाडीतील कळस गावतुन विवाहिता मुलासह बेपत्ता झाली आहे. ही घटना 28 ऑक्टोबरला घडली असून याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मीरा सचिन खेत्रे (वय 34) आणि वेदांत सचिन खेत्रे (वय 15, दोघेही रा. कळसगाव) अशी बेपत्ता झालेल्याची नावे आहेत. याप्रकरणी सचिन मधुकर खेत्रे (वय 40) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा आणि वेदांत 28 ऑक्टोबरला घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर ते पुन्हा घरी परत आले नाहीत. मीरा रंगाने सावळी असून अंगामध्ये निळ्या रंगाचा गाऊन, काळे लांब केस, गळ्यात मंगळसूत्र घातले आहे. तर वेदांतने भगव्या रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे. त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा बोलता येते.यासंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
































































