लालबागमध्ये पुण्याच्या 25 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लालबाग येथील एका इमारतीखाली मित्रांसोबत बसलेल्या पुणे येथील 25 वर्षीय तरुणाचा अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयदीप नेमाडे (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुण्याच्या बावधन येथून ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी आला होता.

17 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. बावधनहून जयदीप लालबाग येथील गणरायांचे दर्शन घेण्यासाठी आला होता. तो तेथील इमारत क्रमांक 3 खाली मित्रांसोबत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने जयदीपचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.