श्रीमंत मुलं अभ्यासाशिवाय 100 टक्के मिळवतात, पेपर फुटीवरून राहुल यांचा आदित्यनाथ, मोदींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील कानाकोपऱयात जाऊन तरुणांना विचारा पेपर लिक होतो की नाही. उत्तर येईल, पेपर लिक होतो. श्रीमंतांना पेपर मिळतो. त्यामुळे ती मुलं अभ्यासाशिवाय 100 टक्के मिळवतात आणि गरीब मुलं केवळ बघत राहतात, अशा शब्दांत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. रायबरेली येथे भारत जोडो न्याय यात्रेत ते बोलत होते.

या वेळी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱया विद्यार्थ्याला राहुल गांधी यांनी विचारले. त्याने सांगितले, आम्ही प्रचंड मेहनत घेतो, अभ्यास करतो. दुसऱया दिवशी ट्विटर, व्हॉट्सअपवर पेपर लीक होतो असे सांगताना हा विद्यार्थी प्रचंड भावूक झाला होता.