राहुल महाजन तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. राहुलने त्याची प्रेयसी नताल्या इलिनासोबत मलबार हिल येथील मंदिरात लग्न केले. नताल्या ही कझाकस्तानमधील मॉडेल आहे. या लग्नाला त्याच्या घरातील मोजकीच जवळची मंडळी उपस्थित होती.

राहुलची जवळपास दोन वर्षापूर्वी काही कॉमन मित्रांमुळे नताल्याशी ओळख झाली होती. त्यानंतर दीड वर्षे ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. राहुल महाजनचे याआधी श्वेता सिंह आणि डिंपी गांगुलीसोबत लग्न झाले होते. मात्र या दोघींसोबतही त्यांचा घटस्फोट झाला.