
सामना प्रतिनिधी। राहुरी
राहुरीत मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला आहे. शुक्लेश्वर मंदिर चौकात सोमवारी एका घरातून चोरट्यांनी १६ हजाराचा मोबाईल चोरला. मात्र घरमालकाला सकाळी उठल्यावर मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर मोबाईल मालक नरेंद्र ठिगळे यांनी पोलिसात तक्रार केली .
राहुरीचे बस स्थानक व गुरूवारचा आठवडे बाजार हे मोबाईल चोरट्यांचे अड्डे झाले आहेत. पण मोबाईल चोरीच्या घटने बद्दल फिर्याद देण्यासाठी जाणा-या नागरिकांना नको त्या पोलीस चौकशीला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याने नागरिकांकडून फिर्याद देणे देखील टाळले जात आहे.
आतापर्यंत मोबाईल चोरीच्या शेकडो घटना घडल्या. पण पोलिसांना अजून मोबाईल चोरट्यांना पकडण्यात य़श मिळालेले नाही. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या कार्यकालात सुरू झालेले मोबाईल चोरीचे सञ दोन पोलीस निरीक्षक बदलुन देखील थांबले नसल्याने पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती वादग्रस्त ठरली आहे. त्यातच राञीच्या वेळी तसेच आठवडे बाजारात व बस स्थानकावर राहुरी पोलिसांनी गस्त बंद झाल्याने चोरट्यांचे आयतेच फावले आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास लावण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयात सायबर यंत्रणाही कार्यान्वित आहे. माञ राहुरीतील मोबाईल चोरीच्या घटनांचा तपास लागत नसल्याने ही यंत्रना देखील कुचकामी ठरली आहे.
































































