रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा पगार बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगाराइतका बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. रेल्वेच्या 11.27 लाख कर्मचाऱ्यांना 1,832 कोटी रुपयांचा प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस दिला जाईल. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना पीएलबी पेमेंट म्हणून दरमहा 7000 रुपये दिले जातात. 78 दिवसांनुसार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून 17 हजार 951 रुपये दिले जातील, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.