
हाथरसमध्ये पुन्हा एका दलित मुलीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.
हाथरसमध्ये एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 29 मार्च रोजी शौचासाठी शेतात गेली होती. तेव्हा तीन जणांनी तिचे अपहरण केले. रात्री तिघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला आणि सकाळी तिच्या घराजवळ सोडून पळ काढला.
या प्रकरणी पीडित मुलीने आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी पीडित मुलीची तक्रार घेतली नाहीच. उलट तिला आण तिच्या वडिलांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. नंतर पीडित मुलीने वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली. तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून पोक्सो अंतर्गत कारवाई केली. पोलिसांनी तीनही आरोपींनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
सप्टेंबर 2020 मध्ये हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला जबर मारहाण करण्यात आली होती. तसेच तिची जीभही कापण्यात आली होती. नंतर दिल्लीत उपचारादरम्यान पीडित मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

























































