
सामना ऑनलाईन । पाटणा
बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महायुतीने आज त्यांचे जागावाटप जाहीर केले. बिहारमध्ये राजद 20 जागांवर तर काँग्रेस 9, हिंदुस्थानी आवाम मोर्चा 3, राष्ट्रीय लोक समता पार्टी 5, वीआईपी 3, सीपीआय 1 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यावेळी काही उमेदवारांची यादी देखील जाहीर केली. जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव हे राजदच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Manoj Jha, RJD on seat sharing: RJD on 20, Congress on 9, HAM-3, RLSP on 5, VIP on 3 and CPI-1 in RJD quota.#LokSabhaElections2019 pic.twitter.com/LlLOqxoqB9
— ANI (@ANI) March 22, 2019
राजदचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पुर्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप व उमेदवारांची यादी जाहीर केली. हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी हे गयामधून निवडणूक लढवणार आहेत. तर जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव हे राजदच्या तिकीटावर संभल येथूल निवडणूक लढवणार असल्याचे समजते. राजदच्या विभा देवी यांना नवादातून तिकीट देण्यात आले आहे.























































