
आज सलग दुसया दिवशी पावसाने जिल्ह्याला झोडपले. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये पावसाने व्यत्यय आणला. मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. गेल्या 24 तासात सरासरी 107 मिमी पाऊस पडला आहे.
दापोली तालुक्यात मुरसुडे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवण्याचे काम सुरु आहे. चिपळूण तालुक्यात पावसेवाडी येथे विष्णू कांबळे यांच्या घरात पाणी शिरल्याने अंशतः नुकसान झाले आहे. गुहागर तालुक्यात गुहागर-चिपळूण-कराड रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटवून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात मांजरी येथे गोविंद रामचंद्र पाडवे यांच्या घराचे 15 हजार 500 रुपयांचे करडे येथील सुनिता अनंत जाधव यांच्या घराचे 25 हजार रुपयांचे, रुपेश अर्जुन गोताड यांच्या घराचे 5 लाख 50 हजार रुपयाचे, मोहन नारायण साठे यांच्या घराचे 15 हजार रुपयांचे, मंगेश मोहन साठे यांच्या घराचे 16 हजार रुपयांचे, कमलाकर काशिनाथ तोटे यांच्या घराचे 20 हजार रुपयांचे, संतोष राजाराम गोठेकर यांच्या घराचे 4 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गोळवली येथील महेंद्र कृष्णा गमरे यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. काळंबोशी येथे सुधीर जगन्नाथ चव्हाण यांच्या घराचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. कोणत्याही ठिकाणी जिवीतहानी झालेली नाही. जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 107 मिमी तर एकूण 965.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. त्यामध्ये मंडणगड 46.90 मिमी, दापोली146.10 मिमी, खेड 61.90 मिमी. गुहागर 202.40 मिमी, चिपळूण 78.80 मिमी, संगमेश्वर 158.60 मिमी, रत्नागिरी 136.40 मिमी, राजापूर 58.50 मिमी, लांजा 78.40 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

























































