रत्नागिरी – नाखरे येथील 37 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील नाखरे येथे एका 37 वर्षीय महिलेने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेरणा प्रताप कोरपे (37, ऱा नाखरे, रत्नागिरी) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेरणा कोरपे यांचे पती प्रताप कोरपे हे मंगळवारी पहाटे 5 वाजता कामासाठी निघून गेले होते. यानंतर प्रेरणा यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास प्रेरणा यांचा मृतदेह घरातील ओटीवर नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याच्या स्थितीत दिसून आल़ा. प्रेरणा यांनी गळफास घेतल्याची माहिती शेजाऱ्यानी प्रेरणा हिचा भाऊ दत्ताराम जोशी यांना दिल़ी. त्यानुसार दत्ताराम जोशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबतची नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर पूर्णगड पोलिसांना या घटनेची माहिती दिल़ी. पूर्णगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.