
नीट परीक्षा पेपर फुटीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि सोनम वायचुंग यांनी जंतरमंतरवर सुरू केलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने केलेल्या अत्याचाराचा मंगळवारी रत्नागिरीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निषेध केला. तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे पत्र शिवसेनेने रत्नागिरी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
जंतरमंतरवर उपोषण सुरू असताना सोनम वागचुंग यांना सरकारने ज्या पद्धतीने उचलून नेले, त्या घटनेचा शिवसैनिकांनी निषेध केला. जंतरमंतरवर जमलेल्या लाखो तरूणांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आणि अत्याचाराचा शिवसैनिकांनी निषेध केला. यावेळी शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नगरसेवक केतन शेट्ये, फौजिया मुजावर, युवासेना जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत, तालुका युवाधिकारी संदेश बारगुडे, माजी नगरसेविका रशीदा गोदड, महिला संघटक सायली पवार, सेजल बोराटे,विभागप्रमुख किरण तोडणकर, दिलावर गोदड, शरद राणे, सचिन सावंत देसाई, प्रशांत रायंगणकर, सुफियान जयगडकर,गंधाली मयेकर,मिताली पवार उपस्थित होते.



























































