रत्नागिरी – घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पडवेकर कॉलनी, उद्यामनगर येथे राहणारे एक कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरटयाने त्यांचे बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. पोलिसांनी चोरट्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी या दाखल गुन्ह्याचा तपास करण्याकरिता तात्काळ एक पथक तयार करून सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या।पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू असताना नमूद गुन्हा हा रेकॉर्ड वरील अट्टल आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे याने केलेला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे वय 45 वर्षे, रा. कोकण नगर बगदादी चौक, रत्नागिरी, यास दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ताब्यात घेऊन त्याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 100% मुद्दे माल (सोन्याचे दागिने ) व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा असा एकूण ₹ 1,66,000/- किमतीचा मुद्दे माल हस्तगत करण्यात आलेला आहे.

आरोपी लियाकत अब्दुल्ला नावडे हा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीचे विविध 11 गुन्हे दाखल आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उनि योगेश खोंडे, पो.हेकॉ विजय आंबेकर, पो.हेकॉ .योगेश नार्वेकर,पो.हेकॉ सागर साळवी, महिला पोहेकॉ वैष्णवी यादव, पो.ना दत्ता कांबळे या पथकाने कारवाई केली.