दापोली – पंचायत समिती सभापती रऊफ हजवानींविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली पंचायत समिती सभापती रऊफ हजवानी यांच्याविरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव बहुमताने संमत झाला आहे. या प्रस्तावाच्या बाजूने 9 तर विरोधात 3 मते पडली आहेत. या अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी शुक्रवारी 11 वाजता झुम अॅपव्दारे पंचायत समितीची सभा पार पडली. या संपूर्ण प्रक्रीयेत पिठासीन अधिकारी म्हणून दापोलीचे उप विभागीय अधिकारी शरद पवार यांनी काम पाहीले.

दापोली पंचायत समितीमध्ये एकूण 12 सदस्य आहेत. यातील 7 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तर 5 पंचायत समिती सदस्य आहेत. पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. समितीवर पहिल्या सव्वा वर्षांसाठी चंद्रकांत बैकर, त्यानंतर सव्वा वर्षांसाठी राजेंद्र गुजर आणि तिसऱ्या टर्ममध्ये हजवानी यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यानंतर योगिता बांद्रे यांच्याकडे समितीचे सभापतीपद जाणार होते. मात्र हजवानी यांनी सभापतीपदाचा राजीनामा न दिल्याने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.