हिंगोली प. स.च्या प्रभारी सभापतीपदी रेणुका भानुदास जाधव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

येथील पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती विलास काठमोडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदावर शिवसेनेच्या जि.प. सभापती रेणुका भानुदास जाधव यांची निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे झाली आहे. जाधव यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवरानी नरवाडे यांच्या उपस्थितीत कार्यभार स्वीकारला असून नवीन सभापतीच्या निवडीपर्यंत त्या काम काम पाहणार आहेत.

हिंगोली येथील पंचायत समितीचे सभापती विलास काठमोडे यांनी आठवडाभरापूर्वी पदाचा राजीनामा जिल्हा परिषद प्रशासनाकडे सोपविला होता. जी. प.ने राजीनामा मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्यावर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या आदेशानुसार आज जि.प. अध्यक्ष शिवरानी प्रकाश नरवाडे व सीईओ एच. पी. तुमोड यांच्या उपस्थितीत प्रभारी सभापतींची निवड करण्यात आली. जी. प. च्या ४ सभापतींच्या नावाच्या चिठ्या टाकण्यात आल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या महिला व बालकल्याण सभापती रेणुका भानुदास जाधव यांच्या बाजूने कौल लागला.

या निवडीनंतर जाधव यांचे जि.प. अध्यक्षा नरवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, कृषी सभापती प्रल्हाद राखुंडे, नाईक, शिक्षण सभापती संजय देशमुख, डेपुटी सीओ नितीन दाताळ, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिल्लारे, गोपू पाटील, भानुदास जाधव, अनिल पतंगे, विठ्ठल चौतमाल , सतीश पाचपुते आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. दरम्यान यानंतर रेणुका जाधव यांनी पंचायत समिती कार्यालयात येऊन सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पंचायत समिती सदस्यांच्या वतीने तसेच गटविकास अधिकारी बोंदरे यांनी सत्कार केला. पंचायत समितीच्या नवीन सभापतीची निवड होईपर्यंत या पदाचा कार्यभार जाधव यांच्याकडे राहणार आहे.