…तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढा – अरविंद सावंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुमची ओळख काय? बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सुरू आहे. त्या शिवसेनेनं तुम्हाला उमेदवारी देऊन मोठ केल़ं आमचं पक्षचिन्ह ‘मशाल’ घेऊन निवडून आलात, जनतेनं मशालीवर मतदान केलं. भाजप आणि मिंध्यांच्या विरोधात 9 जणं निवडून आलो. तुमच्यात धाडस असेल तर राजीनामा द्या आणि निवडणूक लढवा, असं आव्हान शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना दिले.