
सामना प्रतिनिधी । वडीगोद्री
शिवसेना पक्ष जनसामान्यांच्या विकासासाठी कटीबद्ध असून यापुढे सदैव विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी वडीगोद्री परिससरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी केले.
यावेळी शिवसेना जालना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, शिवसेना तालुका प्रमुख उध्दव मरकड, पंकज सोळुंके, उपतालुकाप्रमुख पंडीतराव गावडे, सतिष वाघमारे, विशंभर तारख, भगवान बर्वे आदींची उपस्थिती होती.
पुढे जाधव म्हणाले की, शिवसेना पक्षाने विकास कामात कधीच राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसरच राहीला असून शिवसेना पक्ष जनतेने दिलेल्या मताला व विश्वाला कधी तडा दिला नाही. यापुढेही मतांशी, मातीशी ईमान राखण्यासाठी वचनबद्ध राहील. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मते द्यावी असे अवाहन खासदार संजय जाधव यांनी केली.
वडीगोद्री येथे सिंमेट रस्त्यासाठी ५ लक्ष निधी उपलब्ध करुन उदघाटन केले. तसेच येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या श्री गुरुदेव सेवाश्रम यास भेट देऊन मोडकळीस आलेल्या निवासी खोल्यांची पाहणी करून तसेच प्रार्थना मंदिरासाठी आपल्या खासदार निधीतून १० लक्ष रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन खा.संजय जाधव यांनी दिले आहे. नालेवाडी संत भगवान बाबा यांच्या मंदीराला ५ लक्ष निधी सभामंडप बांधून उद्घाटन करण्यात आले तर दह्याळा येथे रस्त्याच्या कामासाठी ५ लक्ष निधी उपलब्ध करून देवून उद्घाटन केले.
यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उढाण म्हणाले की, निवडणूक आली. राजकीय नेते उद्घाटनाचा धडका लावून नुसते फलक लावतात. मतदारांची दिशाभूल करतात. शिवसेना पक्ष अगोदर खोटे विकासाकामांचे उद्घाटने करीत नाही अगोदर निधी उपलब्ध करुन कामे हाती नंतर उद्घाटने करणारा पक्ष म्हणजे शिवसेना असून युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना मुख्य केंद्रबिंदू मानुन सर्वाधिक कामे झाली असतील तर ते शेतकऱ्यांचे झाली. शेतकऱ्यांचा जिव्हारीचा प्रश्न, विज,पाणी, व सिंचन कामे प्रामुख्याने हाती घेतले जे पंधरा वर्षात आघाडी सरकारच्या काळात नाही ते युती सरकारने पाच वर्षात करुन दाखवून शेतकरी स्वालंबी समृध्द करण्याचे काम केली आहे.
परभणी व घनसावंगी मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकाविण्यासाठी शिवसैनिकांनी जिवाचे रान करण्याचे आवाहनही सहसंपर्क प्रमुख डॉ. हिकमत उडाण यांनी केले. यावेळी गणेश काळे, राज घोगरे, विभागप्रमुख बाळासाहेब गावडे, रजनीश कनके, बळीराम उडदंगे, जर्नाधन घुगे, सोशल मीडिया प्रमुख, साईनाथ चेपटे, किशोर म्हस्के, श्रीकांत बांगर, विठ्ठल बांगर, बाबासाहेब कोल्हे, बप्पासाहेब चौधर, शंकरराव गारुळे, संजय चाबुकस्वार यांच्यासह आदी ग्रामस्थांची उपास्थिती होती.
































































