जालना – राजलक्ष्मी कापड दुकानातील चोरी प्रकरणात नोकर परभणीतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना शहरातील खवा मार्केट परिसरातील राजलक्ष्मी कापड दुकानातील दिड लाखाची कॅश घेऊन पळून गेलेल्या नोकरास परभणी येथून अटक करण्यात आली आहे.

जालना शहरात धनानी बंधुचे राजलक्ष्मी कापड दुकान आहे. 18 ऑक्टोबर रोजी दुकानाचे मालक सुमित धनानी हे बाहेरगावी गेल्यामुळे वडिल श्रीचंद धनानी हे दुकानात होते. त्यांनी दिवसभरात दुकानात आलेला पैसा हा गल्ल्यातच ठेवून ते घरी गेले. 19 ऑक्टोबर रोजी सुमित धनानी दुकानावर आले असता, त्यांना गल्ल्यात पैसे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राजलक्ष्मी कापड दुकानातील सर्व कर्मचार्‍यांची माहिती घेतली. त्यामध्ये एक कर्मचारी अशोक पुंडलीकराव लोळगे हा सुट्टीवर होता. त्यामुळे सदरील चोरीचा संशय त्यांच्यावर बळावला होता. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही तपासले असता, सदरील पैसे अशोक लोळगे याने घेतले असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अशोक लोळगे यास परभणी येथून अटक केली.

अशोक पुंडलीकराव लोळगे याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये १८ ऑक्टोंबर रोजी रात्री दुकान बंद करतेवेळी दुकानातील माळयावर साफसफाई करण्याचे बहाण्याने लपून राहीला व रात्री खाली उतरून दुकानातील गल्यात दिवसभर झालेल्या
व्यवहाराचे रकमेची चोरी केली. सकाळी दुकानामध्ये साफसफाई करण्यासाठी शटर उघडल्यानंतर तो गुपचुपपणे रोख रक्कम घेवुन पसार झाला. पोलिसांनी चौकशी दरम्यान चोरलेली 1 लाख 36 हजार रुपये शहरातील राहत्या घरातून जप्त केले आहे.

सदरची कामगिुरी पोलीस अधीक्षक बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, डी.बी.पथकाचे प्रमुख पोहेकॉ रामप्रसाद रंगे, पोहेकॉ सोमनाथ उबाळे जगन्नाथ जाधव,धनाजी कावळे, सुभाष पवार, नसीम पठाण, भरत ढाकणे यांनी पार पाडली आहे.