
महायुती सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अनेक अटी – शर्ती घातल्या आहेत. त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. सरकारने अटी या शर्ती काढून सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी 12 जूनपासून पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. शेतकऱयांच्या कर्जमुक्तीसाठीचा हा लढा आहे, सर्वांनी शक्य त्या पद्धतीने या लढय़ाला सहकार्य करून शेतकऱयांचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन त्यांनी केले.


























































