पार्थच्या सुरक्षेसाठी रणगाडा द्या; वाय प्लस सुरक्षेवरून रोहित पवार यांचा संताप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून वादाला तोंड फुटलं आहे. पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही टोला लगावला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवारही बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. पार्थ पवार हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत. आता त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकार निशाणा साधला आहे. ‘पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा दिली. आता रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनाही अशीच सुरक्षा देण्यात यावी. त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पार्थच्या वडिलांनी पॅचअप केले, मी मात्र त्याच्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवार यांनी अजित पवारांना डिवचले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘ही राज्याच्या संपत्तीची उधळपट्टी आहे. सुरक्षेची यांना गरज नाही. बऱ्याच जणांना सुरक्षेची गरज आहे. पण त्यांना सुरक्षा दिली जात नाही. यांना गरज नसताना सुरक्षा दिली जातेय. सरकारची ही उधळपट्टी सुरू आहे. सुरक्षेचा आढावा घेतला पाहिजे. सगळ्यांना सरसकट का दिली पाहिजे? नाहीतर मग द्या सर्व 288 आमदारांना वाय प्लस सुरक्षा. विधानपरिषदेच्या सर्व आमदारांना द्या सुरक्षा. ते 40 कोणते मानाचे आहेत का?’, असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

आधी आदिलशाहकडून जॉइनची ऑफर यायची, आता अमित शहांकडून येते; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

‘वाय प्लस दर्जाची सुरक्षा ही कमी आहे. त्यांना झेड सेक्युरीटी द्या. अजून चार पाच गाड्या वाढवा. कोयता गँग सामान्यांना त्रास देतेय. हत्या होत आहेत. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांना सुरक्षा दिली जात नाही. नेत्यांच्या मुलांना सेक्युरिटी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच काम करत आहेत. सागर बंगल्याचं तेवढंच काम आहे. नेत्यांना सांभाळणं आणि सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडणं. पार्थला अजून दोन तीन सिक्युरिटी द्यायला पाहिजे. रणगाडा जर कुठं चालत असेल तर रणगाडाही द्यावा’, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.