रशियाकडून S-400 क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरू; हिंदुस्थानच्या सामर्थ्यात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानला रशियाकडून S-400 क्षेपणास्त्रांचा (S-400 Air Defence Missile System) पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानच्या लष्करी सामर्थ्यात वाढ झाली आहे. तसेच हिंदुस्थानच्या हवाई क्षेत्र अभेद्य झाले आहे. या क्षेपणास्त्रांचे पहिली तुकडी हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

एस 400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम सागरी आणि हवाई मार्गाने हिंदुस्थानात पाठवण्यात येत आहे. जमीनीवरून हवेत मारा करणारी ही प्रणाली हिंदुस्थानला मिळाल्याने हिंदुस्थानची मारक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिंदुस्थानने रशियाशी 5.43 अब्ज डॉलरचा( सुमारे 40 हजार कोटी रुपये) पाच एस 400 रेजीमेंट खरेदीसाठी ऑक्टोबर 2019 मध्ये करार केला होता. त्यानुसार आता त्याचा पुरवठा सुरू झाला आहे.

S-400 सुपसॉनिक एअर डिफेंस सिस्टममध्ये सुपरसॉनिक आणि हायपर सोॉनिक क्षेपणास्त्रे असतात. ती अचूक आणि कमी वेळात लक्ष्यभेद करतात. ही जगातील अत्याधुनिक प्रणाली आहे. ही प्रणाली 400 किलोमीटरच्या क्षेत्रातील शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे,ड्रोन आणि छुप्या शस्त्रास्त्रांचा लक्ष्यभेद करू शकतात. य प्रणालीमुळे सहजसहजी टप्प्यात न येणारी लढाऊ विमानांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.

एस 400 लॉन्चरद्वारे शत्रुची विमाने किंवा क्षेपणास्त्रे यावर तीन सेंकदात दोन क्षेपणास्त्रे सोडण्यात येऊ शकतात. यातून सोडण्यात आलेली क्षेपणास्त्रे 5 किलोमीटर प्रती सेंकदाच्या वेगाने 35 किलोमीटरच्या उंचीपर्यंत जात हल्ला चढवतात. ही प्रणाली हिंदुस्थानला मिळण्यास सुरुवात झाल्याने हिंदुस्थानच्या उत्तर, पूर्व आणि आग्नेय, पश्चिम सीमांना सुरक्षाकवच मिळण्यासोबतच हिंदुस्थानच्या मारक क्षमतेत वाढ झाली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.